१६ जानेवारी ते २१ जानेवारी चालू घडामोडी २०२२ | Current affairs in marathi 16 to 21 January 2022
16 जानेवारी 2022 चालू घडामोडी | 16 January 2022 current affairs
📣 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी , राज्य सेवा पूर्व परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता 23 जानेवारी 2022 ला होणार
📣 महाराष्ट्रात गेल्या 24 तासांमध्ये 42 हजार 462 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली - तर 125 नव्या ओमायक्रॉन पॉझिटिव रुग्णांची नोंद झाली
📣 मूंबईमध्ये सेल्फ कोरोना टेस्ट करणाऱ्यांना - कोरोना टेस्ट किट विकत घेताना आपला आधार कार्ड नंबर केमिस्टला द्यावा लागेल - महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती
📣 राज्यातील ऑक्सिजनची मागणी 700 मेट्रिक टनपेक्षा अधिक झाली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील टाळेबंदीवर निर्णय घेतील - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
📣 उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूर शहरमधून लढणार निवडणूक
📣 22 जानेवारी पर्यंत निवडणूक प्रचारसभा, मेळावे आणि रोडशो वरील बंदी कायम राहील - असे कोरोनामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पस्ट करण्यात आले
📣 16 जानेवारी हा दिवस देशात ‘राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस’ म्हणून साजरा केला जाणार - स्टार्टअप उद्योजकांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घाेषणा
☸️ वर्णनात्मक नोंदी pdf
17 जानेवारी 2022 चालू घडामोडी | 17 January 2022 current affairs
📣 राज्यात 90 टक्के लोकांनां लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे - तर सध्या दररोज 8 लाख लोक लस घेत आहेत - आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
📣 गोव्यात जर आमचं सरकार आलं, आणि प्रत्येकाला रोजगार देणं शक्य झालं नाही, तर बेरोजगारांना तीन हजार रुपये भत्ता देण्यात येईल - अरविंद केजरीवाल यांची घोषणा
📣 राज्यात प्राणवायूच्या खाटांची मागणी वाढत गेल्यास आणि दैनंदिन वैद्यकीय प्राणवायूची मागणी ७०० मेट्रिक टनांपर्यंत गेल्यास -
📣 राज्यातील निर्बंधांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कठोर निर्णय घेतील - असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले
📣 MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांच्या ऑनलाईन अर्जाची प्रोसेस तात्पुरती स्थगित केली - काल संध्याकाळी ५ :४० ला आयोगाने आपल्या ट्विटर हॅण्डलवरून ही माहिती दिली
📣 विमानाने प्रवास करणे आता महाग होऊ शकते - कारण विमानाचे इंधन म्हणजेच Aviation Turbine Fuel च्या दरात 4.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे -
📣 जानेवारी 2022 मधील ही दुसरी वाढ आहे - याआधी 1 जानेवारी रोजी विमान इंधनाच्या दरात वाढ झाली होती -
📣 तसे तुम्हाला माहिती असेल जेट इंधनाच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 आणि 16 तारखेला अपडेट होत असतात - तर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दररोज बदलतात
🚩 मराठी राज भाषा दिन भाषण निबंध
19 जानेवारी 2022 चालू घडामोडी | 19 January 2022 current affairs
📣 स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी - खातेदार आता IMPS म्हणजेच त्वरित पेमेंट सेवेद्वारे ५ लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकतील -
📣 यापूर्वी ही मर्यादा २ लाख रुपये होती - महत्वाचे म्हणजे हा व्यवहार करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही - तर एसबीआयच्या या सूचना १ फेब्रुवारीपासून लागू होतील.
📣 आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींत वाढ झाल्याने - पेट्रोल आणि डिझेल च्या किंमतीत 3 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता
📣 राज्यातील तापमानात अंशता वाढ झाली , तर 21 आणि 22 जानेवारीला खान्देशासह विदर्भात गारपीट होण्याची शक्यता - भारतीय हवामान विभागाची माहिती
📣 महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, 24 तासांत 39 हजारांहून अधिक रुग्ण आढळले - मात्र ओमिक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नाही
📣 Bank of Baroda बँकेच्या नवीन नियमानुसार 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी कन्फर्मेशन करणे अनिवार्य असेल -
📣 जर कन्फर्मेशन नसेल तर चेक परत देखील केला जाऊ शकतो - हा नियम 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिकच्या रकमेच्या चेकवर लागू होईल.
20 जानेवारी 2022 चालू घडामोडी | 20 January 2022 current affairs
📣 राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार चालू आहे - गेल्या २४ तासात राज्यात ४३ हजार ६९७ नव्या कोरोनाबाधितांची - तर २१४ ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली
📣 कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी उड्डाणे 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील - डीजीसीएचा मोठा निर्णय
📣 १९ जानेवारीपासून नीट यूजी काउंसलिंगसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु झाली - उमेदवार या ऑनलाइन अर्जांसाठी mcc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या
📣 टाटा मोटर्सने काल बुधवारी आपल्या सीएनजी कार लाँच केल्यात - कंपनीने आपले Tiago आणि Tigor हे मॉडेल CNG तंत्रज्ञानासह सादर केलेत -
📣 टाटा टियागोच्या एक्सई या मॉडेलची किंमत ६ लाख ९ हजार रुपये - तर टिगोरच्या एक्सझेडची किंमत ७ लाख ६९ हजार ९०० रुपये आहे.
📣 राज्यातील शाळा ,महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला -
📣 तसेच स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार - असे मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले
📣 गोव्यात शिवसेना राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांची घोषणा
21 जानेवारी 2022 चालू घडामोडी | 21 January 2022 current affairs
📣 राज्यातील धरणांमध्ये 80.33 टक्के पाणीसाठा आहे - त्यामुळे यंदा मे महिन्यात सुद्धा ,जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही
📣 महात्मा गांधीजींना मारणाऱ्या नथुराम गोडसे , या व्यक्तीच्या आयुष्यावर चित्रपट येणार - खासदार अमोल कोल्हे या चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारतील -
📣 तर ‘मैंने गांधी को क्यों मारा’ ,असे या चित्रपटाचे नाव आहे - युट्युबवर यांचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे
📣 उत्तरप्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधात - भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद निवडणूक लढतील - तर गोरखपूर मतदारसंघात होईल सामना
📣 स्टेट बँकेप्रमाणे HDFC बँकेने सुद्धा FD व्याजदरात वाढ केली - 12 जानेवारी पासून नवीन व्याजदराची अंमलबजावणी सुरू झाली -
📣 HDFC च्या नव्या व्याजदरानुसार - दोन ते तीन वर्ष कालावधीसाठी - 5.2% , तर तीन ते पाच वर्ष कालावधीसाठी 5.4% - आणि
पाच वर्ष ते दहा वर्ष कालावधीसाठी 5.6% व्याज मिळेल
📣 राज्यातील महाविद्यालय सुरु करण्याबाबत सुद्धा मंत्रिमंडळात चर्चा झाली - मंत्री उदय सामंत यांची माहिती
📣 तर राज्यात ज्या ठिकाणी कोरोना संसर्ग कमी असेल - त्या ठिकाण च्या शाळा 24 जानेवारी पासून सुरु केल्या जातील - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाढ यांची माहिती