चालू घडामोडी 8 मार्च ते 10 मार्च 2022 | Current affairs 8 march to 10 march 2022 marathi

चालू घडामोडी 8 मार्च ते 10 मार्च 2022 | Current affairs 8 march to 10 march 2022 marathi

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये 8 मार्च पासून ते 11 मार्च पर्यंतच्या चालू घडामोडी बद्दल माहिती वाचणार आहोत ही माहिती आपण तयारी करत असलेल्या स्पर्धा परीक्षे करिता नक्कीच उपयोग होईल.



🌄 ०८ मार्च चालू घडामोडी 


📣 हायड्रोजन इंधनावरील देशातील पहिली कार दिल्लीत 16 मार्चपासून चालणार, नंतर ती काही दिवसांत नागपुरात आणणार - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


📣 राज्यभरात पहिल्या मात्रेचे लसीकरण सुमारे 92 टक्के झाले आहे - तर दोन्ही मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण 71 टक्के आहे 


📣 बनावट प्रमाणपत्रे बनवून कोरोना मृत्यूची भरपाई घेणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल - सुप्रीम कोर्टाचा इशारा


📣 5 राज्यांचा एक्झिट पोल समोर आला - उत्तर प्रदेशात योगींना स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज - तर  पंजाबमध्ये AAP आणि उत्तराखंडमध्ये काँग्रेस सरकारची शक्यता आहे 


📣 औरंगाबाद मध्ये लसीकर्णाचे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय ,औरंगाबाद मध्ये लसीचा दुसरा डोस घेतला तरच  - गॅस, सीएनजी तसेच पेट्रोल, आणि डिझेल मिळणार 


📣 नंदी किंवा गणपती दूध पित असल्याच्या अनेक घटना राज्यात घडताना दिसत आहेत - दरम्यान नंदी दूध आणि पाणी पित असल्याचा चमत्कार सिद्ध करणाऱ्याला - 


📣 आम्ही २५ लाखांचं बक्षीस देऊ  - अशी घोषणा अखिल भारतीय अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय महासचिव , हरीश देशमुख यांनी केली आहे 


🎯 राज्यात लवकरच १७०० पदांसाठी भरती होणार - जाणून घ्या महत्वाचे अपडेट


Sprdha Pariksha Updates 2022


📝 विविध विभागातील ही लाखो रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे - याबाबदल सांगताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी - राज्यातील नवीन पदभरती बद्दल माहिती दिली 


👤 काय म्हणाले दत्तात्रय भरणे ? -  त्यानी सांगितले  राज्यात भरतीसाठी १५ हजार ३९० पदांचे मागणीपत्र प्राप्त झाले  - तर १ हजार ७०० पदांसाठी लवकरच जाहिराती प्रसिद्ध होणार असेही ते म्हणाले 


🤔 हे पण समजून घ्या ? - राज्यात कोविडमुळे गेल्या 2 वर्षात शासकीय नोकरभरती झालीच नाही. त्यामुळे विविध शासकीय विभागांसाठी एकूण ११ लाख ५३ हजार पदे मंजूर झाले - तर त्यातील ८ लाख ७७ हजार ४० पदे भरलेली आहेत - मात्र २ लाख ३ हजार ३०३ पदे अजून रिक्त आहेत. 


📣 राज्यात लवकरच पद भरती होणार - हि माहिती स्पर्धा परीक्षकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा  


✈️ आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक ! २७ मार्चपासून पुन्हा सुरु होणार


😱 तुम्हाला माहिती असेल ,दोन वर्षांपूर्वी म्हणजे २३ मार्च २०२० पासून भारतात येणार्‍या आणि भारतातून परदेशी जाणार्‍या 


🛫 आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमानांच्या वाहतुकीवर भारताने निर्बंध घातले होते - मात्र दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा पुन्हा सुरू होणार 


💁‍♂️ केंद्र सरकारने - जगभरात व्यापक प्रमाणात झालेले कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर - आंतरराष्ट्रीय नागरी हवाई विमानसेवा -  २७ मार्च २०२२ पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 


👌 २ वर्षांनंतर - आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु होत आहे , हि माहिती नक्कीच खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 



📣  1 एप्रिलपासून PF खात्यावर लागणार टॅक्स ! - EPFO चा मोठा निर्णय


💰 PF म्हणजेच भविष्य निर्वाह खातेधारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - PF अकाउंटच्या करमुक्त रकमेच्या मर्यादेत बदल करण्यात आले आहेत 


✒️ तसेच काही नवे नियम देखील लागू करण्यात आले आहेत 


🤷‍♂️ पहा कसे आहेत नवे नियम ?


🔰 नवीन आयकर नियमांनुसार गैर-सरकारी कर्मचार्‍यांसाठी करमुक्त रक्कम 2.5 लाख रुपये आहे - तर सरकारी कर्मचार्‍यांसाठी 5 लाख रुपयांची मर्यादा आहे


🔰 म्हणजे जेव्हा एखादा कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त रक्कम होईल  -  तेव्हा त्यावर मिळणाऱ्या इंट्रेस्टवर देखील व्याज आकारले  जाईल


🔰 दरम्यान 1 एप्रिल पासून -  PF खात्यात बदल होत आहेत - हि माहिती सर्व कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना अवश्य शेअर करा 


💁‍♂️  पेट्रोलचे दर १२ ते १७ रुपयांनी वाढवू द्या !  तेल कंपन्यांची केंद्राकडे मागणी


👑 पाच राज्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया संपुष्टात येताच तेल उत्पादक कंपन्यांनी इंधन दरात वाढ करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली आहे. 


🧐 इंडियन ऑईल कंपनीने याबाबत पुढाकार घेतला असून पेट्रोल दरांत १२ ते १७ रुपये वाढ करण्यात यावी, अशी शिफारस केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाकडे केली आहे


🤷‍♂️ आंतरराष्ट्रीय बाजारात -  कच्या तेलाच्या किमती १३० डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत - त्यामुळे दरवाढ निश्चित आहे 


🙂  तेल कंपन्यांनी काल  - तेल दर वाढवण्याची शिफारस केली आहे - ही माहिती सर्व सामान्यांसाठी नक्कीच महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 



🔖  आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमामध्ये मोठा बदल ! -  पहा कसे आहेत नवे नियम


ICC Updates 2022


🧐 क्रिकेट सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रत्येकाला आवडणारा खेळ आहे , जरी क्रिकेट खेळता येत नसेल तरी मात्र प्रत्येक क्रिकेटप्रेमीला क्रिकेटचे नियम माहिती असतात


📝 अशातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत - मेलबर्न क्रिकेट क्लब या क्रिकेटचे नियम बनवणाऱ्या संस्थेने नवे नियम तयार केले आहेत 


🤷‍♂️ पहा कसे आहेत नियम ?


✒️ सध्याच्या नियमानुसार , एखाद्या फलंदाजाने उंच शॉट मारला आणि कॅच आऊट होण्याआधीच तो रन घेण्यासाठी धावला आणि दोन्ही फलंदाज एकमेकांना क्रॉस झाले तर मैदानात येणारा फलंदाज नॉन स्ट्रायकर एण्डला जायचा 


🏏 आता मात्र विकेट नंतरच्या पुढच्या बॉलवर हा नवा फलंदाज थेट स्ट्राईक घेईल ओव्हरचा अखेरच्या बॉलवर जर खेळाडू कॅच आऊट झाला, तर मात्र पुढच्या ओव्हरला नवा बॅटर नॉन स्ट्रायकर एण्डला जाईल


👉 मंकडिंगच्या नियमातही होणार बदल


🔰 मंकडिंग म्हणजे नॉन स्ट्राईकवरील फलंदाज गोलंदाजा चेंडू टाकण्याअगोदर जर क्रिझ सोडून धावत असेल , तर त्यावेळी गोलंदाजाने चेंडू स्टंम्पला लावला तर ते खेळ भावनेच्या विरोधात मानले जात होते


🔰 मात्र नवीन नियमांनुसार , आता चेंडू टाकण्याआधी फलंदाज जर क्रिझ सोडून पुढे गेला आणि गोलंदाजाने चेंडू स्टंम्पला लावला तर त्याला आपली विकेट गमवावी लागणार - असे ICC म्हटले आहे 


📌 दरम्यान एमसीसीचे नवे नियम ऑस्ट्रेलियात या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपपासून लागू करण्यात येणार आहेत


😇 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमामध्ये - बदल झाले हि माहिती आपल्यासाठी , खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 



📣 SEBI चा मोठा निर्णय ! - गुंतवणुकीच्या नियमामध्ये होणार महत्वाचे बदल


✒️ तसे तुम्हाला माहिती असेल - याआधी छोट्या गुंतवणूकदारांना यूपीआयच्या माध्यमातून  2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करता येत होती 


💰 मात्र आता UPI च्या माध्यमातून छोट्या गुंतवणूकदारांना डेट सिक्युरिटीजच्या पब्लिक इश्यूमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे - असे SEBI ने म्हटले आहे 


😇 दरम्यान शेअर मार्केटमध्ये - गुंतवणूक करणाऱ्यांसाठी , हि बातमी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 


🚆  रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय ! - आता रेल्वे प्रवास होणार आणखी स्वस्त


🙏 तसे तुम्हाला माहिती असेल , कोरोनामुळे रेल्वे मंत्रालयाने २३ मार्च २०२० पासून ट्रेनमधून आरक्षित डबे हटवण्याचा निर्णय घेतला होता


💫 दरम्यान आता कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्याने भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेऊन ट्रेनमध्ये आरक्षित डबे पुन्हा बसवण्याचा निर्णय घेतला आहे 


👉 रेल्वेच्या या निर्णयामुळे - प्रवाशांना आता स्वस्तात प्रवास करता येणार आहे , तसेच हा डबा बसवल्यानंतर प्रवाशांना तिकीट बुक करायची गरज भासणार नाही  - म्हणजे प्रवाशांना डायरेक्ट तिकीट काढून प्रवास करता येणार आहे


🙏 रेल्वे मंत्रालयाने - घेतलेला हा निर्णय प्रत्येक रेल्वे प्रवाशांसाठी , खूप महत्वाचा आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 


💥 हे पण वाचा ⤵️

✡️ मागील चालू घडामोडी वाचा