चालू घडामोडी 11 मार्च ते 13 मार्च 2022 | Current affairs 11 march to 13 march 2022 marathi

चालू घडामोडी 11 मार्च ते 13 मार्च 2022 | Current affairs 11 march to 13 march 2022 marathi


🌄 ११ मार्च / सकाळचे बातमी अपडेट Current affairs nots


 Morning Updates


📣 उत्तरप्रदेश, मणिपूर, उत्तराखंड आणि गाेवा विधानसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत, तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टी झाली विजयी 


📣 पंजाब मध्ये आम आदमी पार्टीचे भगवंत मान -  आज विर भगतसिंग यांच्या गावात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील


📣 गोव्यात शिवसेनेची हार झाली - गोव्यातील सर्व दहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार -  त्यांना नोटापेक्षाही कमी मते पडली 

💠 लोकमान्य टिळक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश


📣 निवडणूक निकालांचे शेअर बाजारावर चांगले पडसाद पडले - काल सेंसेक्सने 1552 अंकांची तेजी घेतली - तर निफ्टीमध्ये 411 अंकांची तेजी पाहायला मिळाली. 


📣 विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी - वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी यंदापासून जनरल कॅटीगरीसाठीची 25 वर्षे ही कमाल वयोमर्यादा - आणि  राखीव प्रवर्गासाठीची 30 वर्षाची वयोमर्यादा हटवण्यात आली


🎯 शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश .


📣 सध्या जागतिक स्तरावर लहान मुलांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणारी -  नोव्हावॅक्स ही लस 90 टक्के प्रभावी आहे -  सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांची माहिती


📣 राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या महत्वाच्या घोषणा - प्रत्येकाने वाचा 

Budget Updates


📝 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा २०२२ - ०२३ या वर्षाचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे - दरम्यान अर्थसंकल्पातील काही महत्वाच्या घोषणा आपण या मॅसेज मध्ये पाहू 


💁‍♂️ अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा


● मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी, सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशुशाळा उभारणार


● 8 कोटी रुपये खर्च करुन 8 मोबाईल कर्करोग निदान वाहने सुरु करणार


● सर्व जिल्‍ह्यांच्‍या ठिकाणी 100 खाटांची महिला रुग्‍णालय उभारणार


● देशातील होतकरु विद्यार्थ्‍यांना प्रवेश मिळावा म्‍हणून मुंबई, नाशिक आणि नागपूरमध्‍ये संस्‍था


● टाटा कॅन्सर संशोधन केंद्राला रायगड जिल्ह्यात खानापूरमध्ये जमीन


● प्रत्येक जिल्ह्यात टेलिमेडिसिन रुग्णालय, ३ हजार १८३ कोटींचा निधी


● पुणे शहरात ३०० एकरवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार , सगळ्या उपचार पद्धती एकाच छताखाली


​​​​​​​● प्रशिक्षित मनुष्‍यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्नित करणार


● पायाभुत सुविधांसाठी भरीव तरतूद


● छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार सुरु करणार


● कर्मचाऱ्यांची २७५ कोटी ४० लाखांची देणी देणार


● ४१ हजार कोटींचे कर्ज वाटप


​​​​​​​● वसमत येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र १०० कोटींचा निधी मिळणार


● येत्या तीन वर्षांत मराठवाड्याला ३ हजार कोटी रुपये​​​​​​​


● शेततळे अनुदानात वाढ


● महिला सन्मान योजना वर्ष


● अन्न प्रक्रीया येत्या तीन वर्षांत राबविणार


​​​​​​​● कृषी निर्यात धोरण तयार करणारे महाराष्ट्र पहिले


● नियमीत कर्जफेड शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदानात​​​​​​​​​​​​​​


● या आर्थिक वर्षात कृषी सिंचन योजनेचा विस्तार करणार


● २० लाख शेतकऱ्यांना लाभ होणार


● शेतकऱ्यांसाठी ६० हजार वीज कनेक्शन जोडणार​​​​​​​


​​​​​​​● बैलांसाठी विशेष योजना​​​​​​​


● जलसंपदा विभागासाठी १३ हजार कोटींचा निधी


● आरोग्य सेवांवर तीन वर्षांत ११ हजार कोटी रुपयांचा खर्च


● हवेलीमध्‍ये छत्रपती संभाजी महाराज यांच स्‍मारक उभारणार, २५० कोटी रुपये खर्च करणार


● विदर्भ, मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन शेतकर्यांना उत्‍पादकात वाढविण्‍याठी निधी 


👌 अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या -  या घोषणा सर्व नागरिकांसाठी , खूप महत्वाच्या आहेत - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 


🤷‍♂️ राज्यात सीएनजी आणि पीएनजी गॅस स्वस्त होणार - अर्थसंकल्पात झाली मोठी घोषणा


 Budget Updates


⚡ राज्याचा २०२२-२३ चा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत मांडला. 


👉 राज्य सरकारने नैसर्गिक वायूवरील करात १० टक्क्यांची कपात केली. नैसर्गिक वायूचा कर १३.५ टक्क्यांवरून ३.५ टक्के इतका केला आहे. यामुळे राज्यात सीएनजी आणि पीएनजी गॅस स्वस्त होणार


📍 दरम्यान, नैसर्गिक वायूचा वापर वाढवण्याच्या दृष्टीने नैसर्गिक वायूवरील करामध्ये १० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे - दरम्यान यामुळे राज्याच्या तिजोरीत अंदाजे ८०० कोटी रुपयांची महसुली घट होणार आहे. 


🙂  राज्यात सीएनजी आणि पीएनजी गॅस स्वस्त होणार  - ही माहिती सर्व सामान्यांसाठी नक्कीच महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 


जाणून घ्या ! कशी उघडता येईल LPG गॅस एजन्सी - पहा महत्वाचे व्यवसाय अपडेट


Informative Updates


🏺  LPG गॅस एजन्सी चालू करण्याबाबतची माहिती आपण या आगोदर सुद्धा घेतलेली आहे , मात्र यामध्ये काही बदल झालेले आहेत 


🙋‍♂️  गॅस एजन्सी घेण्यास किती किंमत आहे -  यासाठी अर्ज करण्याबरोबरच तुम्हाला त्याची फी भरावी लागेल, यात शहरी आणि शहरी वितरकांमध्ये सर्वसाधारण 10000 रुपये तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील वितरकांमध्ये सर्वसाधारण 8000 रुपये अर्ज फीज राहते 


💰  गॅस एजन्सीमध्ये सुरक्षा ठेव किती असते - शहरी आणि अर्ध-शहरी भागातील डिलरशिप किंवा वितरकांसाठी एकूण सुरक्षा ठेव 5 लाख रुपये तर ग्रामीण आणि दुर्गम क्षेत्र वितरकांसाठी 4 लाख रुपये राहते ,दरम्यान जर आपण आरक्षणाच्या श्रेणीत आला तर अर्जासाठी आणि सुरक्षा ठेवीसाठी रक्कम थोडी कमी लागते


💁‍♂️  जाणून घ्या गॅस एजन्सीची पात्रता


●  यासाठी अर्ज करण्यासाठी किंवा नवीन एजन्सी कुठं देणे चालू आहे ,यांच्या माहितीसाठी आपण www.lpgvitarakchayan.in या वेबसाईट ला भेट देऊ शकता 


●  नवीन नियमानुसार कोणतीही 10 वी पास व्यक्ती गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकते. पूर्वी पदवीधर असणे अनिवार्य होते.


●  तसेच आता 21 ते 60 वर्षांपर्यंतची व्यक्ती गॅस एजन्सीसाठी अर्ज करू शकते. पूर्वी जास्तीत जास्त वयोमर्यादा 21 ते 45 वर्षे पर्यंत होती.


●  यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांना थोडा शिथिलता किंवा दिलासा मिळणार आहे - आता यामध्ये अर्जदाराविरोधात पोलिसांचा कोणताही गुन्हा दाखल होऊ नये.


●  तसेच अर्जदाराकडे गॅस सिलिंडर साठवण्यासाठी कोठार किंवा पूर्वनिर्मित गोदामांसाठी जमीन असावी


●  सर्वात महत्वाचे म्हणजे अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबातील सदस्य कोणत्याही तेल विपणन कंपनीत कर्मचारी नसावेत ,तसे सध्या आपल्या राज्यात गॅस एजन्सी देण्यायाबात कुठली जाहिरात नाही


●   याविषयी आणखी माहिती आली तर आम्ही लवकरच माझी बातमी मध्ये त्याचे अपडेट देऊ  


●  गॅस एजन्सी चालू करण्याबाबतची - हि माहिती नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे , आपण इतरांना अवश्य शेअर करा 


🎯 राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणक्षेत्रासाठी जाहीर झालेल्या महत्वाच्या घोषणा - प्रत्येकाने वाचा 


Budget Updates


✒️ राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला - यामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी विविध घोषणा जाहीर केल्या आहेत

🤷‍♂️ पहा शिक्षण क्षेत्रासाठी कोणत्या आहेत घोषणा ? 

● उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद

● शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद

● मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी 

● सांस्कृतिक विभागासाठी 193 कोटींच्या निधीची तरतूद तसेच 

● क्रीडा विभागासाठी 354 कोटींच्या निधीची तरतूद 

🙏 राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणक्षेत्रासाठी - जाहीर झालेल्या या घोषणा विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी , खूप महत्वाच्या आहेत - आपण इतरांना देखील शेअर करा


🌾  शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाल्या या महत्वाच्या घोषणा

Budget Updates 2022


📝 राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प काल सादर केला - यामध्ये कृषी क्षेत्रासाठी त्यांनी विविध घोषणा जाहीर केल्या आहेत

💁‍♂️ पहा कशा आहेत घोषणा ?

🔰 भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाणार - तसेच पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल केले जातील 

🔰 हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार - तसेच नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजारांऐवजी 75 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे

🔰 दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात येणार , त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात येणार 

🔰 कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्यात येईल 

🔰 जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू करण्यात आली आहे 

🔰 त्याचबरोबर भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार आहे - शेततळ्यासाठीच्या अनुदानात वाढ करण्यात येईल 

🔰 देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार

🔰 प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प

🔰 या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार

🔰 एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्य

🔰 मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी 

👌 राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कृषी क्षेत्रासाठी - जाहीर झालेल्या घोषणा प्रत्येक शेतकऱ्यांसाठी , खूप महत्वाच्या आहेत - आपण इतरांना देखील शेअर करा


💁‍♂️  18 वर्षे पूर्ण होण्याआधी सुद्धा मिळणार पॅन कार्ड ! - जाणून घ्या काय आहे प्रक्रिया ?

Informative Updates


🧐  तसे तुम्हाला माहिती असेल - आपण एखाद्या बँकेमध्ये खाते उघडण्यासाठी गेलो, की आपल्याला ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणि पॅन कार्डची आवश्यकता असते  

👶  मात्र 18 वर्षांखालील मुलांचे पॅन कार्ड नसल्यामुळे पालकांच्या गुंतवणुकीसाठी त्यांना नॉमिनी करायचं असेल किंवा मुलाच्या नावावर गुंतवणूक करायची असेल तर पॅनकार्डची गरज असते 

🗣️  मात्र आता NSDL दिलेल्या माहितीप्रमाणे -18 वर्षांखालील मुलांचे पॅन कार्ड काढता येईल - यासाठी मुलाच्या पालकांनी NSDL कडे अर्ज करणे आवश्यक आहे

🤷‍♂️  कसे काढता येईल पॅन कार्ड ?

📝 18 वर्षांखालील मुलांचे पॅन कार्ड काढण्यासाठी पालकांचा पत्ता,आधार कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र यांपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट आणि रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे 

💵 या डॉक्युमेंट्ससोबतच मुलांच्या वयाचा पुरावा, पालकांचे फोटो आणि सह्याही अपलोड कराव्या - डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर 107 रुपये फी भरून फॉर्म सबमिट करा 

💫 त्यानंतर आपल्याला एक पावती क्रमांक मिळेल - तसेच एक व्हेरिफिकेशन ई-मेल येईल - त्यानंतर 15 दिवसांच्या आत आपल्याला पॅन कार्ड मिळेल - असे NSDL ने सांगितले 

👌  18 वर्षांखालील मुलांनाही पॅन कार्ड मिळेल - हि माहिती पालकांसाठी, नक्कीच खूप महत्वाची आहे, आपण थोडासा वेळ काढून - इतरांना देखील शेअर करा  

आता पासपोर्टसाठी पोलीस स्टेशनला जाण्याची आवशक्यता नाही - पहा महत्वाचे अपडेट

Passport Updates


📜 तुम्हाला माहिती असेल विमान प्रवासासाठी किंवा इतर देशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे , आणि पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्याची वारी करावी लागते 

👮‍♂️ मात्र आता पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही  - मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबत घोषणा केली आहे

💁‍♂️ जाणून घ्या याविषयी सविस्तर ?

🔰 पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले - आता पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलावले जाणार नाही

🔰 यामध्ये केवळ जर तुमचे कागदपत्र अपुरी असतील , किंवा इतर अपवादात्मक परिस्थितीतच नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलवले जाईल - असे त्यांनी सांगितले 

🔰 हीच पद्धत संपूर्ण राज्यात राबविण्याची मागणी होत आहे - तसे याविषयी काही अपडेट आले तर आम्ही लवकरच तुमच्या पर्यंत पोहचवू 

🔰 पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी -  पोलीस स्टेशनला जाण्याची आवशक्यता नाही - हि माहिती महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा 


EPFO ​​चा मोठा निर्णय ! - पीएफच्या व्याजदरात मोठी कपात


 Employee Updates 2022


🧐 EPFO ​​च्या खातेधारकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे - केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या 'पीएफ'वरील व्याजदरात मोठी कपात केली आहे

💫 दरम्यान हि कपात गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी कपात असल्याने पगारदारांना मोठा झटका बसला आहे

🤷‍♂️ पहा काय सांगितले केंद्र सरकारने ?

🔰 तसे तुम्हाला माहिती असेल , गेल्या आर्थिक वर्षात पीएफवर 8.5 टक्के व्याज मिळत होते 

🔰 दरम्यान EPFO ने आता 2021-2022 या आर्थिक वर्षासाठी 8.1 टक्के व्याजदर निश्चित केला आहे 

🔰 EPFO ने घेतलेला हा निर्णय - सर्व कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे  - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा 
https://www.maazinukari.com/2022/03/8-11-2022-current-affairs-8-march-to-11.html